blog

Ata Tari Mukhavata Kadhun Tak! – Lockdown Poem

आता तरी मुखवटा काढून टाक

अरे अजून भरपूर time आहे आरामात करू अस म्हणत म्हणत ह्या परिस्थितीत अडकल्याने झालास ना शॉक?

कल करे सो आज कर म्हणत कर एक नवीन शुरुवात… आता तरी मुखवटा काढून टाक।।

माझे इतके फ्रेंड्स आणि इतके followers त्यांना आता मारून बघ एक हाक।

कोणी आले नाही तर होऊ नकोस शर्मसाद… फक्त आता तरी मुखवटा काढून टाक।।

इतके दिवस mcd आणि kfc चे फोटोस Insta आणि Facebook वर टाकून खूप मिळवली दाद।

खरी मज्जा घरच्याच जेवणाची असते एकदा आईच्या हातचे जेवण तर चाख… आता तरी मुखवटा काढून टाक।।

I, me, myself म्हणाईचास ना? जेव्हा स्वतःची मुलगी अंतर जातीय लग्न करते तेव्हा म्हणतात मुलीने माझं कापलं नाक।

आताच्या परिस्थितीत तीच मुलगी बापाच्या काळजीने विव्हळतेय कोणता समाज नाही देत साथ… आता तरी मुखवटा काढून टाक।।

ह्या धर्मा मूळे हे झाले… नाही त्या जाती मूळे हे झाले… अरे नाही रे त्या देश प्रदेशामुळे हे झाले ह्यानेच राजकारण्यांचे चालते चाक।

काय भाऊ कसा आहेस अशी किती नगरसेवक, आमदार की खासदारांनी आपुलकीची मारली साद… आता तरी मुखवटा काढून टाक।।

आज एक निश्चय कर की माणसाला माणसासारखं बघीन…. आता जाती धर्माच्या बेड्या करून टाकीन खाक।

माणसातल्या माणसाला बघू न देणाऱ्यांना देऊ एक चपराख… आता तरी मुखवटा काढून टाक।।

चुकूनही हा आजार जर तुला झालाच तर कोणी उचलाईलाही येणार नाही तुझी राख।

त्यामुळे घरीच थांबून देश कार्यात घे सहभाग… आता तरी मुखवटा काढून टक।।

— आनंद निकम